आमचे ध्येय (Vision)
आमचे ध्येय (Vision)
महिलांना कौशल्य प्रशिक्षण, स्वयंरोजगार, सूक्ष्म उद्योग, बचतगट सक्षमीकरण आणि आर्थिक स्वावलंबनासाठी आवश्यक मार्गदर्शन व संधी उपलब्ध करून देणे.
युवक-युवतींना उद्योगाभिमुख प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता विकास आणि डिजिटल कौशल्यांच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनविणे.
गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, शिष्यवृत्ती, करिअर मार्गदर्शन, डिजिटल शिक्षण आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी सहाय्य करणे.
वृक्षारोपण, प्लास्टिकमुक्त अभियान, स्वच्छता उपक्रम, जलसंवर्धन आणि पर्यावरण जनजागृतीद्वारे शाश्वत विकासाला चालना देणे.
आरोग्य तपासणी शिबिरे, जनजागृती मोहीम, पोषण, महिला व बाल आरोग्य तसेच सामाजिक सुरक्षा उपक्रम राबविणे.
CSR, शासकीय संस्था, स्वयंसेवक, दाते आणि स्थानिक समुदाय यांच्या सहकार्याने दीर्घकालीन व परिणामकारक सामाजिक विकास प्रकल्प राबविणे.